पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी
पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी

पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचे समोर आले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनला सोमवारी (ता. २१) रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी असलेल्या ऑडिओ क्लिप मिळाल्या आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर अज्ञात फोनवरून धमक्या असलेल्या ऑडिओ क्लिप पाठवण्यात आल्या. यासंदर्भात वाहतूक पोलिसांकडून तत्काळ स्थानिक वरळी पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. या माहितीच्या आधारे पोलिसांकडून गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला. ज्या क्रमांकावरून धमक्या आल्या त्या क्रमांकाचा युजर आयडी शोधण्याचा पोलिसांचा तपास सुरू आहे. ऑडिओ मेसेजमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा अंडरवर्ल्डने कट रचला आहे. त्यासाठी त्याने मुस्ताक अहमद आणि मुस्ताक या दोघांना पंतप्रधानांच्या हत्येची सुपारी दिली आहे.