महाड तालुक्यातील राईस मिलला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाड तालुक्यातील राईस मिलला आग
महाड तालुक्यातील राईस मिलला आग

महाड तालुक्यातील राईस मिलला आग

sakal_logo
By

अलिबाग, ता. २२ : महाड तालुक्यातील ढालकाठी येथील मुक्ताई राइस मिलला मंगळवारी (ता. २२) सायंकाळी सातच्या सुमारास आग लागली. मिलच्या पत्र्यावरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक केबलला शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे सांगण्यात आले. यात राइस मिलच्या पत्र्याने पेट घेतला; मात्र सुदैवाने ही आग मिलमध्ये खाली असलेल्या भाताच्या कोंड्याला लागण्यापूर्वी विझवण्यात आली. त्यामुळे सुदैवाने अनर्थ टळला आहे. आगीने रौद्ररूप धारण केले असते, तर मात्र आजूबाजूच्या घरांनादेखील धोका निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र वेळीच आग आटोक्यात आल्याने कोणतीही मोठी हानी झाली नाही. महाड एमआयडीसीमधील अग्निशमन दलाने ही आग तत्काळ विझवली.