पामबीच मार्गावर तीन वाहनांमध्ये अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पामबीच मार्गावर तीन वाहनांमध्ये अपघात
पामबीच मार्गावर तीन वाहनांमध्ये अपघात

पामबीच मार्गावर तीन वाहनांमध्ये अपघात

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : वाशीमधून पामबीचमार्गे बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या तीन वाहनांमध्ये अपघात झाल्याने एक महिला जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात तिन्ही वाहनांचे नुकसान झाले. नेरूळ पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

सोमवारी (ता. २१) रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास पामबीच मार्गावरून वाशी येथून बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या कारचालकाने पाठीमागील वाहनांसाठी कुठल्याही प्रकारचा सिग्नल दिला नव्हता. पाठीमागून भरधाव वेगाने येणारी कार इको कारवर जोरात धडकली. त्यामुळे इको कार आपल्यापुढे असलेल्या एर्टिगा कारवर धडकली. या अपघातात इको कारमधील महिला जखमी झाली. पामबीच मार्गावरील वजराणी स्पोर्ट्स क्लबजवळच्या सिग्नलवर हा अपघात घडला. या अपघातातील तिन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यावर थांबल्याने इतर वाहनांची कोंडी झाली होती. या वेळी सीवूड्स वाहतूक पोलिस, तसेच नेरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून पामबीच मार्गावरील वाहतूक सुरळीत केली.