वृध्द महिलेची फसवणूक करणारा तोतया प्रशासकीय अधिकारी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृध्द महिलेची फसवणूक करणारा तोतया प्रशासकीय अधिकारी अटकेत
वृध्द महिलेची फसवणूक करणारा तोतया प्रशासकीय अधिकारी अटकेत

वृध्द महिलेची फसवणूक करणारा तोतया प्रशासकीय अधिकारी अटकेत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : ओशिवरा परिसरात प्रशासकीय अधिकारी असल्याचे भासवून एका वृद्धेला लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी २४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी रविवारी (ता. २०) आरोपीला खार रेल्वे स्थानकाबाहेरून अटक केली. आरोपीवर ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
११ नोव्हेंबर रोजी आरोपी कथितपणे मुंबई महापालिकेचा अधिकारी म्हणून पीडितेच्या राहत्या फ्लॅटवर पोहोचला. पीडित महिलेने तिच्या फ्लॅटमध्ये काही बांधकाम केल्यामुळे तिला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा दावा करून आरोपीने तिला धमकी दिली. तसेच कारवाई थांबवण्यासाठी तिच्याकडे पैशांची मागणी केली. महिलेने नकार दिल्यावर आरोपीने फ्लॅटमध्ये घुसून तिची सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला; परंतु तिने प्रतिकार केल्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. ओशिवरा पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आणि त्याचा माग काढत त्‍याला अटक केली.