चोरीचा गुन्हा उघडकीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरीचा गुन्हा उघडकीस
चोरीचा गुन्हा उघडकीस

चोरीचा गुन्हा उघडकीस

sakal_logo
By

धारावी, ता. २३ (बातमीदार) : धारावीतील एका इमारतीतील रहिवासी महिला शनिवारी (ता. १९) भाजी आणण्याकरिता बाहेर गेल्या असताना त्‍यांच्‍या घरी चोरी झाली. याबाबत रविवारी (ता. २०) गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी मंगळवारी रात्री आरोपीला अटक केली आहे. त्‍याच्‍याकडून चोरी केलेले ७० हजार रुपये किमतीचे दागिने हस्‍तगत करण्यात आले आहेत. मोहम्मद अस्लम मोहम्मद अक्रम शेख ऊर्फ शिबू असे या आरोपीचे नाव असून तो मुंब्रा येथील रहिवासी आहे. हा आरोपी लालबहाद्दूर शास्त्री मार्ग धारावी येथे येणार असल्याबाबत पोलिसांना माहिती प्राप्त झाली होती. त्‍यावर सापळा लावून आरोपीस ताब्यात घेण्यात आले. धारावी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिपाई गालफाडे, जतकर, पवार व वाघ यांनी ही कामगिरी केली.