गंजाड येथे बायफ संस्थेतर्फे शेतकरी मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गंजाड येथे बायफ संस्थेतर्फे शेतकरी मेळावा
गंजाड येथे बायफ संस्थेतर्फे शेतकरी मेळावा

गंजाड येथे बायफ संस्थेतर्फे शेतकरी मेळावा

sakal_logo
By

कासा, ता. २३ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी याकरिता एसीजी केअर फाऊंडेशन आणि बायफ यांच्यावतीने गंजाड ग्रामपंचायतीमधील नवनाथ या गावात १७६ शेतकरी कुटुंबांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत आदिवासी शेतकऱ्यांचे फळबाग, भाजीपाला, फूलशेती लागवडीतून उत्पन्न वाढविण्याकरिता, शेती आधारित उपजीविका विकास प्रकल्प बायफसोबत शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर राबवण्यात येत आहे.
या प्रकल्पांअंतर्गत शेतकऱ्याला वाडी, जंगली रोपे, फूलशेती, सुधारित शेती, जलस्रोत विकास, मृदा व जलसंधारण, शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिक व अभ्यास दौरा असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या प्रकल्पाचा भाग म्हणून गंजाड ग्रामपंचायतीमधील नवनाथ गावामध्ये १७६ शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या शेतकरी मेळाव्याला एसीजी केअर फाऊंडेशनचे सुनील कुमार, तामणी यादव, रवी बोतकुलवार, तसेच बायफचे मुख्य कार्यक्रम अधिकारी सुधीर वागळे, बायफचे विभागीय कार्यक्रम अधिकारी रितीराज सिंग, विनोद बोरसे यांच्यासह गावातील शेतकरी उपस्थित होते.
............................
कृषी साहित्य, स्प्रे पंपचे वाटप
या शेतकरी मेळाव्यास प्रातिनिधिक स्वरूपात कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य व स्प्रे पंपचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात एकूण ३०० कुटुंबे सहभागी झाले होते. शेतकरी राम भुरभुरे व प्रवीण वरठा यांनी मनोगत व्यक्त करून मेळाव्याची सांगता झाली. या मेळाव्याचे आयोजन बायफ प्रकल्प अधिकारी संतोष आगळे, प्रकल्प समन्वयक किरण भागडे, गोरक्ष आव्हाड, अरविंद अंधेर, संदेश यांनी केले.