पोयसर नदीवरील विस्तारीत पूल सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोयसर नदीवरील विस्तारीत पूल सुरू
पोयसर नदीवरील विस्तारीत पूल सुरू

पोयसर नदीवरील विस्तारीत पूल सुरू

sakal_logo
By

कांदिवली, ता. २३ (बातमीदार) ः चारकोप विधानसभा क्षेत्रामध्ये मंगळवारी (ता. २२) महापालिका (पूल विभाग) आर/दक्षिण विभागातर्फे पोयसर नदीवरील मंगुभाई दत्तानी विस्तारित पूल सुरू करण्यात आला आहे. याचे उद्‌घाटन खासदार गोपाळ शेट्टी व आमदार योगेश सागर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी परिमंडळ सातच्‍या उपायुक्त भाग्यश्री कापसे, पश्चिम उपनगरच्‍या उपप्रमुख अभियंता कल्पना राऊळ, सहायक आयुक्त ललित तळेकर आदी मान्‍यवरांसह नागरिक उपस्थित होते.
दरम्‍यान स्थानिक नवतरुण मित्र मंडळातर्फे लालजी पाडा (पोलिस चौकी) ते कांदिवली पश्चिम शेअर रिक्षा स्टॅंड, तसेच न्यू लिंक रोड पूर्ण पुष्टीकरण व पावसाळी गटार बनविण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभही या वेळी गोपाळ शेट्टी व योगेश सागर यांच्‍या हस्ते पार पडला.

अधिकारीवर्गाला लोकशाहीची भीती राहिलेली नाही. अधिकारीवर्ग काम करीत नसल्याने खासदार, आमदार आणि नगरसेवक यांना जनतेची कामे करावी लागतात.
– गोपाळ शेट्टी, खासदार

विस्‍तारित पुलामुळे अंतर कमी झाले आहे. यामुळे स्थानिक नागरिक, प्रवासी आणि वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
– योगेश सागर, आमदार