क्षुल्लक कारणावरून तरुणाला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्षुल्लक कारणावरून तरुणाला मारहाण
क्षुल्लक कारणावरून तरुणाला मारहाण

क्षुल्लक कारणावरून तरुणाला मारहाण

sakal_logo
By

मानखुर्द, ता. २२ (बातमीदार) ः मानखुर्दमध्ये क्षुल्लक कारणावरून सुरक्षा रक्षकाने सोमवारी (ता. २१) विश्वनाथ ऊर्फ बारक्या देवळेकर या तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा नोंदवून सुरक्षा रक्षक हुसेन शेख याला मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे. मानखुर्दच्या मोहिते पाटील नगर येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या ठिकाणी हुसेन याला खासगी सुरक्षा रक्षक हुसेन याला नियुक्त करण्यात आले आहे. त्याचा आणि बारक्याचा याआधी वाद झाला होता. बारक्या मित्रांसह बोलत उभा असताना. हुसेनने त्यापैकी एका मित्राला फोन करून बारक्याला बांधकामाच्या जवळ असलेल्या चहाच्या दुकानाजवळ बोलावले. त्यानंतर तिथून बांबू उचलून मारहाण सुरू केली. बारक्याने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवून मंगळवारी (ता. २३) पहाटे पोलिसांनी हुसेनला अटक केली.