कुणबी वधुवर मेळाव्याचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुणबी वधुवर मेळाव्याचे आयोजन
कुणबी वधुवर मेळाव्याचे आयोजन

कुणबी वधुवर मेळाव्याचे आयोजन

sakal_logo
By

कल्याण, ता. २३ (बातमीदार) ः कुणबी समाजातील शहरी व ग्रामीण भागातील उपवर वधू-वरांसाठी २७ नोव्हेंबर रोजी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कुणबी समाज प्रतिष्ठानच्या वतीने कल्याण येथील बिर्ला कॉलेज रस्त्यावरील सिद्धिविनायक हॉल येथे हा मेळावा होणार आहे. या मंडळात जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातून आतापर्यंत सुमारे दोन हजाराच्यावर वधू-वरांची नोंदणी झालेली आहे. प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम गेल्या आठ वर्षांपासून राबवला जात आहे. त्यामध्ये हजारो विवाह जुळून आले आहेत. रविवारी होणाऱ्या या मेळाव्यात जास्तीत जास्त वधू-वरांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराम वाळिंबे, वधू-वर सूचक मंडळाच्या प्रमुख ज्योत्स्ना जाधव, सचिव संतोष पाटील यांनी केले आहे.