थंडी वाढल्‍याने स्‍वेटर खरेदीसाठी झुंबड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थंडी वाढल्‍याने स्‍वेटर खरेदीसाठी झुंबड
थंडी वाढल्‍याने स्‍वेटर खरेदीसाठी झुंबड

थंडी वाढल्‍याने स्‍वेटर खरेदीसाठी झुंबड

sakal_logo
By

डोंबिवली, ता. २३ (बातमीदार) : गेल्या काही दिवसांपासून जिल्‍ह्यात रात्री थंडीचा तडाका जाणवू लागला आहे. त्यानिमित्त नागरिकांनी डोंबिवलीच्या बाजारात उबदार कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे. शहरातील फडके रोड, मधुबन टॉकीज एरिया, राजाजी पथ, नेहरू रोड आदी ठिकाणी स्‍वेटर खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे.
स्वेटर, मफलर, हात मोजे, कान टोपी, जॅकेट अशा विविध प्रकारचे साहित्‍य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांची रेलचेल वाढली आहे. अडीचशे रुपयांपासून ते दोन हजारापर्यंत विविध प्रकारचे रंगीबेरंगी आकर्षक स्वेटर्स विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी स्वेटर खरेदीसाठी पाच टक्क्यांनी वाढ झालेली असल्‍याचे विक्रेता अनुज सिंह यांनी सांगितले.
-----------------------------------
महिलांसाठी स्वेटरचे प्रकार
बेल्ट फॅन्सी स्वेटर ४०० ते ५०० रुपये
सॉफ्टवेअर वेल्‍वेट ४५० ते ५५० रुपये
पारंपरिक लोकर स्वेटर २५० ते ३०० रुपये
लेडिज जॅकेट ३०० ते ७०० रुपये
--------------------------
पुरुषांसाठी स्वेटरचे प्रकार
गळा असलेले स्वेटर ३५० ते ४०० रुपये
साधे स्वेटर २०० रुपये
लेझर जॅकेट १००० ते १५०० रुपये
स्‍लीवलेस स्वेटर २५० ते ३०० रुपये
--------------------
लहान मुलांसाठी स्वेटरचे प्रकार
साधे स्वेटर २०० ते २५० रुपये
उडन टोपी ५० ते ६० रुपये
हात मोजे ४० ते ८० रुपये