शिवसेना शहरप्रमुखपदी श्रीनिवास वाल्मिकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना शहरप्रमुखपदी श्रीनिवास वाल्मिकी
शिवसेना शहरप्रमुखपदी श्रीनिवास वाल्मिकी

शिवसेना शहरप्रमुखपदी श्रीनिवास वाल्मिकी

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २३ (बातमीदार) ः अंबरनाथला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शहरप्रमुखपदी श्रीनिवास वाल्मीकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरप्रमुख अरविंद वाळेकर शिंदे गटात गेल्यामुळे मागील काही दिवसांपासून रिक्त असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. शहरप्रमुखपदी जुने शिवसैनिक असलेल्या श्रीनिवास वाल्मीकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष विजय पवार यांची उपजिल्हाप्रमुखपदी; तर संभाजी कळमकर- शहर संघटक, पश्चिम; संजय सावंत- शहर संघटक, पूर्व; पूर्व विभाग उपशहरप्रमुख म्हणून अरविंद मालुसरे, मिलिंद गान, राजेश शिर्के आदींची, तर पश्चिम विभागाचे उपशहरप्रमुखपदाची धुरा प्रकाश डावरे, अरुणकुमार सिंग यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. किशोर सोरखादे यांची उपशहरप्रमुख, ग्रामीण आणि पद्माकर दिघे यांची शहर सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.