घंटागाडीतून स्त्रवणाऱ्या द्रवामुळे दुचाकींचा अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घंटागाडीतून स्त्रवणाऱ्या द्रवामुळे दुचाकींचा अपघात
घंटागाडीतून स्त्रवणाऱ्या द्रवामुळे दुचाकींचा अपघात

घंटागाडीतून स्त्रवणाऱ्या द्रवामुळे दुचाकींचा अपघात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ ः केडीएमसीच्या ओला कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाड्या रस्त्यावरून जात असताना त्यातून एक चिकट द्रव रस्त्यावर सांडतो. या द्रवावरून बाईकस्वार घसरून शहरात अपघात घडत आहेत. मंगळवारी (ता. २२) सकाळी ठाकुर्ली उड्डाणपुलावर असाच रस्त्यावर पडलेल्या द्रवावरून तीन ते चार दुचाकीस्वार घसरून पडल्याची घटना घडली आहे. याची माहिती मिळताच स्थानिकांनी रस्त्यावर माती टाकत तूर्तास अपघाताच्या घटना टाळल्या आहेत. मोठी दुर्घटना यामध्ये झाली नसली, तरी एका लहान मुलाच्या पायाला खरचटले आहे. चार-पाच दिवसांपूर्वीच या ठिकाणी अशाच स्वरूपात तीन दुचाकीस्वारांचे अपघात याच कारणामुळे झाले होते. त्यामुळे याकडे पालिका प्रशासनाने गांर्भीयाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.