अंबरनाथमध्ये सिटी पार्कची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबरनाथमध्ये सिटी पार्कची मागणी
अंबरनाथमध्ये सिटी पार्कची मागणी

अंबरनाथमध्ये सिटी पार्कची मागणी

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. २३ (बातमीदार) ः मोठे गार्डन, सायकल ट्रॅक, स्केटिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, मेडिटेशन सेंटर, ॲम्पीथियटर, बास्केट बॉल कोर्ट, फुटबॉल कोर्ट, चिल्ड्रन्स प्ले आदी विविध प्रकारच्या सुविधा असणाऱ्या सिटी पार्कची अंबरनाथमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उभारणी करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केली आहे. अंबरनाथमध्ये २५ एकर जागेमध्ये सिटी पार्क उभारण्यासाठी लागणारा प्राथमिक २० कोटींचा विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे. यासंदर्भातील निवेदन नुकतेच खासदार डॉ. शिंदे यांना देण्यात आले आहे.

सिटी पार्कमध्ये योगा परिसर, झुंबा डान्स सेक्शन, आऊटडोर जिम, फाऊंटेन, प्लांटेशन एयर प्युरिफायर, बॅडमिंटन कोर्ट, गोल्फ कोर्स, इको ड्राइव वे, वॉटर कॅनाल लहान पूल, बोटिंग, स्मॉल वॉटर बॉडी, तलाव यांचा अंतर्भाव करावा. सिटी पार्कच्या माध्यमातून अंबरनाथसह उल्हासनगर आणि परिसरातील नागरिकांना हक्काची जागा उपलब्ध होईल यासाठी त्वरित प्रस्ताव करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सिटी पार्कसाठी अंबरनाथमधील जाणकार मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहेत. याचा विचार करून शहरात सिटी पार्कची उभारणी करण्याबाबतचे निवेदन निखिल सुनील चौधरी यांनी नुकतेच खासदार डॉ. शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले.