करण ठाकुरला ‘आनंद श्री किताब’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करण ठाकुरला ‘आनंद श्री किताब’
करण ठाकुरला ‘आनंद श्री किताब’

करण ठाकुरला ‘आनंद श्री किताब’

sakal_logo
By

ठाणे, ता. २३ (बातमीदार) ः आनंद भारती समाज ठाणे संस्थेच्या विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे श्री आनंद भारती महाराज पुण्यतिथीनिमित्त चंपाषष्ठी उत्सव १३ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने मैदानी क्रीडा स्पर्धांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. २० नोव्हेंबर रोजी ४० वी श्री आनंद २०२२ हौशी शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मीडियम गटातील ॲब्ज जिमचा करण ठाकूर ४० व्या आनंद श्री किताबाचा मानकरी ठरला. ठाणे जिल्हास्तरीय स्पर्धेत ५० पेक्षा जास्त स्पर्धकांना मागे टाकत करणने हे यश संपादन केले. स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या आर फिटनेस सेंटरने १३ गुण मिळवत उपविजेतेपद मिळवले. ॲब्ज जिमचा विवेक सिंग स्पर्धेतील सर्वोत्तम शरीरसौष्ठव प्रदर्शक ठरला.

स्पर्धेतील गटनिहाय निकाल :
शॉर्ट गट : गोरख भांडकोळी (मसल फ्युजन जिम, वासींद), राम लाड (शाहू जिम, भिवंडी), विशाल देसाई (समर्थ व्यायामशाळा, डोंबिवली).
मीडियम गट : करण ठाकूर (ॲब्ज जिम, ठाणे), नीलेश दवणे (युनिव्हर्सल फिजिक सेंटर, भिवंडी), रमेश तेमर(आर फिटनेस सेंटर).
टॉल गट : जगन्नाथ जाधव (बळीराम मोकाशी व्यायामशाळा, विटावा), राजीव कार्डोझ (मॉस्टर फॅक्टरी जिम, ठाणे).
सुपर टॉल : नंदलाल झा (ॲब्ज जिम, ठाणे), भूषण पाटील (आर फिटनेस सेंटर, ठाणे), अभिषेक लोंढे (अपोलो जिम, कळवा).