दुभेले बंधुंना आदर्श शिक्षक पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुभेले बंधुंना आदर्श शिक्षक पुरस्कार
दुभेले बंधुंना आदर्श शिक्षक पुरस्कार

दुभेले बंधुंना आदर्श शिक्षक पुरस्कार

sakal_logo
By

शहापूर, ता. २३ (बातमीदार) ः ठाणे जिल्हा परिषदेंतर्गत दिला जाणारा ‘तालुका आदर्श शिक्षक’ पुरस्कार तालुक्यातील खर्डी विभागातील टेंभा येथील दोन भावांना देण्यात आला आहे. रमेश शांतराम दुभेले व अनिल शांताराम दुभेले अशी त्यांची नावे असून दोघांचे केंद्र जरी वेगळे असले, तरी त्यांच्या शैक्षणिक कामाची दखल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने घेतल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

दुभेले बंधूंनी शहापूरपासून ३५ किमी लांब असलेल्या टेंभा या गावी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण करून शिक्षकाची नोकरी स्वीकारली. यात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, उपक्रम राबवणे याचबरोबर शासनाच्या आदेशाने देण्यात येणारे शालाबाह्य उपक्रमदेखील वेळेत पूर्ण करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या शैक्षणिक कामाची दखल घेऊन त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला असून शहापूर पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदा दोन भावांना एकत्र आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दुभेले बंधूंचे उद्योजक शिवाजी अधिकारी, गणेश राऊत, समाजसेवक शामबाबा परदेशी, खर्डीचे उपसरपंच मोसीम शेख यांनी अभिनंदन केले.