कॅन्सर रुग्णांसाठी रक्तदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॅन्सर रुग्णांसाठी रक्तदान शिबिर
कॅन्सर रुग्णांसाठी रक्तदान शिबिर

कॅन्सर रुग्णांसाठी रक्तदान शिबिर

sakal_logo
By

खारघर, ता. २३ (बातमीदार) : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीद झालेले मुंबई पोलिस दलातील शहीद योगेश पाटील यांच्या स्मरणार्थ खान्देश विकास फाऊंडेशनच्या वतीने कॅन्सर रुग्णांसाठी रक्‍तदान शिबिराचे आयोजन केले आहे. खारघरमधील टाटा कॅन्सर रुग्णालयातील रुग्णांसाठी शनिवारी (ता. २६) हे शिबिर पार पडेल. खारघर सेक्टर १९ मधील रामशेठ ठाकूर पब्लिक शाळेत सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व नाव नोंदणीसाठी ९९६७६६१८६२, ९४२०६४५३८१ या क्रमांकावर संपर्क साधवा, असे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.