जनतेची कामे केल्‍यावरच त्‍यांचे सहकार्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनतेची कामे केल्‍यावरच त्‍यांचे सहकार्य
जनतेची कामे केल्‍यावरच त्‍यांचे सहकार्य

जनतेची कामे केल्‍यावरच त्‍यांचे सहकार्य

sakal_logo
By

वाशी, ता. २३ (बातमीदार) ः लोकप्रतिनिधींनी जनतेची कामे करावीत, तरच जनता आपल्याला सहकार्य करेल, असे प्रतिपादन आमदार गणेश नाईक यांनी केले. ऐरोली विधानसभा मतदार संघातील घणसोली प्रभाग-३१ मध्ये विविध नागरी सुविधा कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण करण्यात आले. या वेळी नाईक बोलत होते.
घणसोली नोडच्या परिसरात माजी नगरसेवक घनश्याम मढवी व माजी नगरसेविका सीमा गायकवाड यांनी प्रभागातील सोसाट्यांना भेडसावणारा पाणीप्रश्न आणि विविध प्रश्न जाणून घेतले. त्याची सोडवणूक करण्यासाठी त्यांनी अविरतपणे केलेला पाठपुरावा आणि त्यांना आलेले यश कौतुकास्पद आहे, असेही नाईक यांनी या वेळी सांगितले.
याप्रसंगी ऐरोलीचे माजी आमदार संदीप नाईक यांच्यासह कार्यक्रमाचे निमंत्रक माजी नगरसेवक घनश्याम मढवी, समाजसेविका ललिता मढवी, सीमा गायकवाड, उत्तम म्हात्रे, लक्ष्मण पाटील आदी मान्‍यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कामांचा शुभारंभ
घणसोली विभागातील आगरी चौक ते गुणाली तलावाजवळ ड्रेन, डक्ट व पदपथ बांधणे, गावदेवीवाडी अभिनव मित्र मंडळ परिसरातील पदपथ गटारर दुरुस्ती कामाचा शुभारंभ, मोफत ज्येष्ठ नागरिक दाखले वाटप व मोफत प्रधानमंत्री जनआरोग्य (हेल्थ कार्डचे) वाटप आदी नागरी कामांच्या शुभारंभासह सुशोभित केलेल्या गुणाली तलावाचा लोकार्पण समारंभ, घणसोली डी मार्ट ते स्व. दगड चाहू पाटील काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्याचे लोकार्पण या वेळी करण्यात आले.