बेवारस वाहनांची रस्त्यावर पार्किंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेवारस वाहनांची रस्त्यावर पार्किंग
बेवारस वाहनांची रस्त्यावर पार्किंग

बेवारस वाहनांची रस्त्यावर पार्किंग

sakal_logo
By

कोपरखैरणे, ता. २३ (बातमीदार) ः टॉप्स ग्रुप या खासगी सुरक्षा कंपनीने काही वर्षांपूर्वी टॉप्स लाईन अग्निशमन यंत्रणा सुरू केली होती. त्यांची वाहने बंद अवस्थेत धूळ खात रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत पडली असल्याने पालिकेने त्यांना नोटीस दिली आहे; तरीही संबंधित कंपनी कुणालाही न जुमानता मनमानी कारभार करत वाहन काढत नसल्‍याचे दिसून येत आहे.
धूळ खात पडलेल्या या वाहनांवर पालिकेने नोटीस लावली असली, तरी ती नोटीस वाचण्यास कंपनीचा कोणी अधिकारी येत नाही. त्यामुळे पालिकेने याबाबत गांभीर्याने कारवाई करावी, अशी मागणी पादचारी करू लागले आहेत.
टॉप्स ग्रुप या खासगी सुरक्षा कंपनीने काही वर्षांपूर्वी टॉप्स लाईन नावाने अग्निशमन व रुग्णवाहिका अशी दुहेरी उपयोगी वाहने सरकारच्या सहकार्याने नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिली होती; मात्र ही खासगी वाहने प्रतिसादाअभावी धूळ खात पडली आहेत. पालिकेने या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देत या वाहनावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.