स्काय वॉकवर तिकीट खिडकीची गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्काय वॉकवर तिकीट खिडकीची गरज
स्काय वॉकवर तिकीट खिडकीची गरज

स्काय वॉकवर तिकीट खिडकीची गरज

sakal_logo
By

धारावी, ता. २३ (बातमीदार) : धारावीतून माहीम रेल्‍वे स्थानकाकडे जाण्यासाठी एम.एम.आर.डी.ए.तर्फे स्कायवॉक उभारण्यात आला आहे; मात्र स्कायवॉकवरून आल्यावर प्रवाशांना तिकीट घराकडे जाण्यासाठी स्थानकाजवळील पूल उतरून तिकीट काढून पुन्हा पूल चढून स्थानकात जावे लागत आहे. स्कायवॉकवर तिकीट खिडकी नसल्याने प्रवाशांना हा प्राणायाम करावा लागत आहे. यावर लवकरात-लवकर तोडगा काढून स्कायवॉक व पादचारी पुलाच्या मध्यवर्ती तिकीट खिडकी उभारावी व प्रवाशांना होत असलेल्या त्रासातून त्यांची सुटका करावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
धारावीतून माहीम स्थानकाकडे जाण्यासाठी स्थानिकांना ६० फुटी संत कबीर मार्ग ओलांडून जावे लागत होते. यामुळे ८ वर्षांपूर्वी स्कायवॉक उभारण्यात आला होता; पण हा स्कायवॉक माहीम स्थानकाला जोडला नसल्याने प्रवाशांना व पादचाऱ्यांना धारावी मुख्य रस्त्यावरून चालत जावे लागत होते. मात्र आता स्कायवॉक स्थानकाला जोडला गेल्याने प्रवासी व पादचारी समाधान व्यक्त करत आहेत. मात्र, साहित्य व बोजा घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना तिकिटासाठी चढ-उतार करावे लागत असल्याने अनेक जण स्कायवॉकवरून न जाता जुन्या मार्गाने जाऊन तिकीट काढून पुढच्या प्रवासास जात आहेत. या त्रासातून सुटका व्हावी, अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करत आहेत.