राज्यपालांच्या निषेधार्थ मिरा-भाईंदरमध्ये आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यपालांच्या निषेधार्थ मिरा-भाईंदरमध्ये आंदोलन
राज्यपालांच्या निषेधार्थ मिरा-भाईंदरमध्ये आंदोलन

राज्यपालांच्या निषेधार्थ मिरा-भाईंदरमध्ये आंदोलन

sakal_logo
By

भाईंदर, ता. २३ (बातमीदार) : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मिरा-भाईंदर काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी उपमहापौर सय्यद नूरजहाँ हुसैन यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी काशी मिरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन केले. राज्यपालांनी महापुरुषाचा अपमान करून शिवप्रेमी नागरिकांसह महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने हटवण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
संवैधानिक पद भूषवणाऱ्या महाराष्ट्राच्या राज्यपालांनी राज्याची सूत्रे हाती घेतल्यापासूनच सतत समाजसुधारक, महापुरुषांवर वादग्रस्त, आक्षेपार्ह विधाने करीत असल्याने त्यांना केंद्र सरकारने त्वरित पदमुक्त करावे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी केली. यावेळी माजी नगरसेवक अनिल सावंत, फरीद कुरेशी, रुबिना शेख, प्रदेश प्रतिनिधी प्रकाश नागणे, राकेश राजपुरोहित, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव दीप काकडे, युवक अध्यक्ष सिद्धेश राणे आदी उपस्थित होते.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता अशा लोकांना पाठीशी घातले जात आहे. आमचे नेते खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर हे माफीवीर होते, हे पत्रकार परिषद घेऊन कागदपत्रांसह दाखवून दिल्यानंतर भाजप, शिंदे सेना, मनसे यांनी राज्यभर आंदोलन केले. आता शिवरायांचा अपमान करणारी वक्तव्ये करणाऱ्या राज्यपाल महोदय व प्रवक्त्याविरोधात का आंदोलन करीत नाहीत. भाजप या दोघांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखवतील का, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.