भूगर्भातील गूढ आवाजाने हादरले वेहळोली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भूगर्भातील गूढ आवाजाने हादरले वेहळोली
भूगर्भातील गूढ आवाजाने हादरले वेहळोली

भूगर्भातील गूढ आवाजाने हादरले वेहळोली

sakal_logo
By

किन्हवली, ता. २३ (बातमीदार) : किन्हवली परिसरातील वेहळोली (खु.) गावाला दुपारी अडीचच्या दरम्यान भूगर्भातील स्फोटाने सौम्य धक्का जाणवला. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावापासून एक किलोमीटरच्या अंतरावर पाटबंधारे विभागाचे मोठे धरण आहे.

शहापूर तालुक्यातील किन्हवली परिसरातील वेहळोली (खु.) गावात मंगळवारी (ता. २२) दुपारी अडीचच्या सुमारास हा धक्का जाणवला. गावापासून एक किलोमीटर अंतरावर पाटबंधारे विभागाचे मोठे धरण आहे. या धक्क्याने गावातील घरांचे अथवा इतर मालमत्तेचे तसेच धरणाचे कुठलेच नुकसान झाले नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
------------------------
वेहळोली गावाला बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याबाबत धरणाच्या देखभालीसाठी कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याकडून माहिती घेण्यात आली. धरणाचे कोणतेही नुकसान झालेले नाही.
- सुरेश चव्हाण,
शाखा अभियंता, लघुपाटबंधारे मुरबाड कार्यालय (अंतर्गत कळवा शाखा)