मराठी नामफलकासाठी मनविसे आग्रही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठी नामफलकासाठी मनविसे आग्रही
मराठी नामफलकासाठी मनविसे आग्रही

मराठी नामफलकासाठी मनविसे आग्रही

sakal_logo
By

भिवंडी, ता. २४ (बातमीदार) : येथील ओसवाल शिक्षण आणि राहत संघ संचलित हालारी विशा ओसवाल या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी गुजराती, इंग्रजीमध्ये नामफलक लावण्यात आले आहेत. हे नामफलक हटवून तात्काळ मराठीतील फलक लावण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. शाळा व्यवस्थापन व संस्थेच्या संचालकांना याबाबतचे निवेदन मनविसेकडून देण्यात आले आहे.

भिवंडी शहरातील अनेक अमराठी शाळांचे नामफलक इतर भाषेत आहेत, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, अशी तक्रार मनविसेने केली आहे. हालारी विशा ओसवाल या शाळेसह इतर शाळांचे नामफलकही मराठीतच असावेत. तसेच शाळेचा शासकीय पत्रव्यवहार हा मराठीत असावा. यासाठी महापालिका, शिक्षण मंडळ आणि भिवंडी तालुका गटशिक्षण अधिकारी यांनी कधीच आग्रह केला नसल्याने मराठीची दुरवस्था झाल्याचे मनविसे आणि भाषाप्रेमी नागरिकांनी सांगितले. हालारी विशा ओसवालचे व्यवस्थापन मराठी भाषेचे अवमूल्यन करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या शाळा व महाविद्यालयाचे नामफलक मराठीत न झाल्यास मनसे विद्यार्थी सेना मनसे स्टाईलने आंदोलन करेल, असा इशारा मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आला. याप्रसंगी मनविसेचे जिल्हाध्यक्ष परेश चौधरी व तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह मनविसेचे पदाधिकारी उपस्थित होते.