कांचनमाला चुंबळे यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांचनमाला चुंबळे यांचा गौरव
कांचनमाला चुंबळे यांचा गौरव

कांचनमाला चुंबळे यांचा गौरव

sakal_logo
By

जव्हार, ता. २३ (बातमीदार) : जव्हार येथील राणी प्रियवंदा सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून बहुमोल कामगिरी केल्याबद्दल कांचनमाला चुंबळे यांना पालघर जिल्हा ग्रंथालय महोत्सव २०२२ मध्ये गौरवविण्यात आले. चुंबळे या माजी नगराध्यक्षा असून सामाजिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. शिवाय त्यांनी वाचक संस्कृती वाढविण्यासाठी, जपण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी चर्चासत्र, काव्यवाचन, व्याख्यानमाला तथा दिनविशेष आदी विविधांगी उपक्रमातून अधिकाधिक वाचक कसे तयार होतील यासाठी ग्रंथपाल या सेवा कार्यातून त्यांनी बहुमोल कार्य केले आहे. त्यांचे बहुमोल योगदान लक्षात घेवून त्यांचा जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्याकडून गौरव करण्यात आला.