कळंबोली पुलाच्या डागडुजीचे काम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळंबोली पुलाच्या डागडुजीचे काम सुरू
कळंबोली पुलाच्या डागडुजीचे काम सुरू

कळंबोली पुलाच्या डागडुजीचे काम सुरू

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. २३ (वार्ताहर) : पनवेल-मुंब्रा मार्गावरील पूल व रस्त्याची दुरवस्था झाली होती. या संदर्भात ‘सकाळ’मध्ये छापलेल्या वृत्ताची दखल घेऊन सार्वजनिक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने रस्ते व पुलाच्या डागडुजीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या पनवेल व मुंब्रा रस्त्याची व पुलाची दुरवस्था झाली आहे. पनवेल-मुंब्रा महामार्गावरील कळंबोली सर्कल ते फूडलॅन्ड चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. नवी मुंबईलगत, सायन-पनवेल महामार्ग आणि न्हावा-शेवा बंदरातून येणाऱ्या मार्गाला कळंबोली सर्कल येथे जोडले आहे. त्यामुळे पनवेल-मुंब्रा महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मुंबई व नवी मुंबईच्या वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळवण्यासाठी विशेषतः अवजड वाहनचालक या मार्गाचा सर्रास वापर करतात. हा मार्ग पुढे ठाणे, भिवंडी व नाशिक या महत्त्वाच्या शहरांना जोडला गेला आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. आता या ठिकाणच्या रस्त्याचे काम सुरू केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

खड्ड्यांमुळे जीव धोक्यात
वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जाणारा रस्त्यावर सुरक्षिततेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना नसल्यामुळे या मार्गावरील पुलावर आणि फूडलॅन्ड चौकात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेक वाहनचालक आणि नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.