हलक्या वाहनांचा निर्णय दोन आठवड्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हलक्या वाहनांचा निर्णय दोन आठवड्यात
हलक्या वाहनांचा निर्णय दोन आठवड्यात

हलक्या वाहनांचा निर्णय दोन आठवड्यात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २३ : गोखले पुलावर हलक्या वाहनांना प्रवेश देण्याबाबतचा निर्णय शक्यतितक्या लवकर घेण्यात येईल, अशी ग्वाही पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे. दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना गोखले पुलावरून प्रवेश देण्याच्या मुद्द्यावर आयआयटी मुंबई आणि व्हीजेटीआय या दोन्ही संस्थांकडून पालिकेला अहवाल प्राप्त झाले आहेत. या दोन्ही अहवालाचा आठवडाभरात अभ्यास करण्यात येईल. अहवालाच्या अभ्यासानंतर स्थानिक पातळीवर काय करणे गरजेचे आहे याची खबरदारी घेऊनच दोन आठवड्यांत याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असल्याचे वेलरासू यांनी सांगितले. 

आयआयटी मुंबई आणि व्हीजेटीआय यांच्या संयुक्त पथकाने रविवारी (ता.२०) गोखले पुलाच्या ठिकाणी संयुक्त पाहणी केली. त्यानंतर काही उपाययोजना करण्यासाठीच्या सूचना त्यांनी पालिकेला दिल्या आहेत. पुलाच्या ठिकाणी काही भाग मजबूत केल्यास त्यावरून तात्पुरत्या स्वरूपात हलक्या वाहनांची वाहतूक सुरू होऊ शकते, असे अहवालात नमूद केले होते. पाहणी आणि चाचणीनंतरच पालिकेला याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठीच पालिकेला दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी अपेक्षित असल्याचे वेलरासू यांनी सांगितले.