शौचालयांमध्ये ‘स्वयंचलित सीट कव्हर अप’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शौचालयांमध्ये ‘स्वयंचलित सीट कव्हर अप’
शौचालयांमध्ये ‘स्वयंचलित सीट कव्हर अप’

शौचालयांमध्ये ‘स्वयंचलित सीट कव्हर अप’

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ : रेल्वेच्या सार्वजनिक शौचालयांमध्ये वेस्टर्न कमोडमध्ये बहुतेक जण मूत्रविसर्जन करण्यापूर्वी सीट कव्हर उचलत नाहीत. ज्यामुळे इतरांना त्याचा वापर करणे अस्वच्छ वाटते. या समस्येवर मात करण्यासाठी मध्य रेल्वेने ‘स्वयंचलित सीट कव्हर अप’ ही नवीन संकल्पना तयार केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे हे कव्हर बसवण्यात आले आहेत. कमोडवर यांत्रिकरित्या कार्य करणारी स्वयंचलित सीट कव्हर लिफ्टअप व्यवस्था करण्यात आली आहे. यातील स्प्रिंग सीट कव्हर ‘लिफ्ट अप पोझिशन’मध्ये ठेवते. जेव्हा त्याचा वापर केवळ शौचालयाच्या उद्देशासाठी करावा लागतो, तेव्हा ते सहजपणे खाली ढकलता येऊ शकतो. जोपर्यंत एखादी व्यक्ती त्याचा वापर करत असेल तोपर्यंत ते खाली राहील, अन्यथा ते आपोआप वरच्या आणि सामान्य स्थितीत परत येईल. हे स्वयंचलित सीट कव्हर अप मुंबई विभागातील इतर रेल्वेस्थानकांवरील स्वच्छतागृहांमध्ये बसवण्यात येणार आहेत.