उघड्या गटारात पडून तरुणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उघड्या गटारात पडून तरुणांचा मृत्यू
उघड्या गटारात पडून तरुणांचा मृत्यू

उघड्या गटारात पडून तरुणांचा मृत्यू

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २३ (बातमीदार) : नालासोपारा येथे एका उघड्या गटारात पडून २५ वर्षीय तरुणाचा बळी गेला आहे. याबाबत आचोळे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र या घटनेने पालिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. ऋषभ सरकार (वय २५) असे गटारात पडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. नालासोपारा पूर्व एव्हरशाईन परिसरातील पार्वती अपार्टमेंटमध्ये तो राहत होता. सोमवारी (ता. २१) तो कामानिमित्त सकाळी घराबाहेर पडला होता. रात्री घरी परतत असताना त्याच्याच इमारतीच्या बाजूच्या फूटपाथवरून चालताना उघड्या गटारात तोल जाऊन पडला आणि त्याचा गटारातील पाण्यात गुदमरून मृत्यू झाला. ऋषभ आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.