लिफ्ट कोसळून दोन कामगारांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लिफ्ट कोसळून दोन कामगारांचा मृत्यू
लिफ्ट कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

लिफ्ट कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

sakal_logo
By

भिवंडी, ता. २३ (बातमीदार) : भिवंडी शहरातील मिल्लतनगर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. २३) सायंकाळी घडली. जलालुद्दिन खान (वय २४) व ओमप्रकाश गौतम (वय ४१) अशी मृत कामगारांची नावे आहेत. मिल्लत नगर येथे टोलेजंग १४ मजली अंबर हाईट इमारत उभारणीचे काम सुरू असून त्या ठिकाणी हे कामगार काम करीत असताना तळमजल्यावरून वरील भागात कामासाठी लिफ्टने जात होते. सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात उशिराने आकस्मिक मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.