१७ वर्षांपासून न्यायालयात गैरहजर राहणाऱ्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१७ वर्षांपासून न्यायालयात गैरहजर राहणाऱ्यास अटक
१७ वर्षांपासून न्यायालयात गैरहजर राहणाऱ्यास अटक

१७ वर्षांपासून न्यायालयात गैरहजर राहणाऱ्यास अटक

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २३ (वार्ताहर) : नेरूळ परिसरात अश्लील सीडीची विक्री करताना पकडला गेलेला व मागील १७ वर्षांपासून या खटल्याच्या कामकाजासाठी न्यायालयात हजर न राहणाऱ्या किशनलाल रोषनलाल अरोरा (वय ६५) या आरोपीला नेरूळ पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. किशनलालविरोधात न्यायालयाने नॉनबेलेबल वॉरंट काढल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली. बेलापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याच्याकडून बाँड लिहून घेत त्याची जामिनावर सुटका केली.