येऊरमध्ये पर्यटन स्थळाचे काम लवकर सुरू होईल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येऊरमध्ये पर्यटन स्थळाचे काम लवकर सुरू होईल!
येऊरमध्ये पर्यटन स्थळाचे काम लवकर सुरू होईल!

येऊरमध्ये पर्यटन स्थळाचे काम लवकर सुरू होईल!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील २७ आदिवासी पाड्यातील नागरिकांच्या समस्या राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनी जाणून घेत त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. संबंधित अधिकाऱ्यांनाही योग्य त्या सूचनाही केल्या आहेत. याशिवाय येऊर येथील आरक्षित असलेल्या भूखंडावर पर्यटन स्थळाचे काम लवकरात लवकर मंजूर करून सुरू होणार आहे. हुमायून धबधब्याजवळील तीन बंधारे बांधण्याच्या कामाला तसेच पाटोणा पाड्याजवळील व चेना नदीवरील बंधाऱ्याच्या कामाला लवकरात लवकर मंजुरी देण्याचे आदेशही गावीत यांनी दिल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
येत्या ६ डिसेंबर रोजी मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामधील मुन्शी कम्पाऊंड येथे आदिवासी भवनाचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याचेही सरनाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. ठाणे व मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील २७ आदिवासी पाड्यांमधील समस्यांबाबत आदिवासी विकास मंत्री गावीत यांच्या दालनामध्ये आमदार सरनाईक यांच्या विनंतीवरून बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध विषयांसंबंधी चर्चा करण्यात आली. बैठकीला वन विभागाचे प्रधान सचिव जी. मल्लिकार्जुन, उपसचिव (वने) भानुदास पिंगळे, सहायक वन अधिकारी उदय ढगे, कार्यकारी अभियंता आदिवासी विभाग सिद्धेश सावर्डेकर आदी उपस्थित होते.