सरंग्याला ‘जी. आय.’ टॅग मिळण्यासाठी नॅफचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरंग्याला ‘जी. आय.’ टॅग मिळण्यासाठी नॅफचा प्रयत्न
सरंग्याला ‘जी. आय.’ टॅग मिळण्यासाठी नॅफचा प्रयत्न

सरंग्याला ‘जी. आय.’ टॅग मिळण्यासाठी नॅफचा प्रयत्न

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. २४ (बातमीदार) : सातपाटी येथे मिळणारा सरंगा हा मासा दर्जेदार आणि चवीसाठी प्रसिद्ध आहे; मात्र त्‍याला जिओग्राफिकल इंडिकेशन ‘जी. आय.’ टॅग मिळालेला नाही. जागतिक स्तरावर सरंग्याची नोंद व्‍हावी, यासाठी नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमन (नॅफ) प्रयत्न करणार आहे.
जागतिक मत्स्योद्योग दिनाचे औचित्य साधत पालघर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची नुकतीच सभा घेण्यात आली. या सभेत नॅफचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी यांनी हे प्रतिपादन केले. सरंग्याची नैसर्गिक भौगोलिक उत्पत्ती, उत्पादन, दर्जा, श्रम आणि संसानाद्वारे आर्थिक मूल्य प्राप्त व्हावे, श्रमजीवींना न्याय मिळावा म्हणून सरंग्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्‍याचे त्‍यांनी या वेळी सांगितले.
याचबरोबर सातपाटी मासेमारी बंदराची आणि मासेमारांची झालेली दयनीय परिस्थिती, समुद्र आणि किनाऱ्यावरील प्रदूषण, निरनिराळ्या प्रकल्‍पांचे अतिक्रमण होत असल्याने मत्स्य दुष्काळाचा प्रश्न यावरही चर्चा करण्यात आली. या वेळी नॅफचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, प्रदेशाध्यक्ष राजहंस टपके, कार्याध्यक्ष विकास कोळी, डॉ. रूपेश कोळी, संजय तरे, सुभाष तामोरे, राजेंद्र मेहेर, भूषण भोईर, जितेंद्र तामोरे, हर्षदा तरे आदी उपस्थित होते.