शहापुरात संविधा रॅलीचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापुरात संविधा रॅलीचे आयोजन
शहापुरात संविधा रॅलीचे आयोजन

शहापुरात संविधा रॅलीचे आयोजन

sakal_logo
By

खर्डी, ता. २४ (बातमीदार) : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने शहापूर येथे संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मंगळवारी (ता. २२) बैठकीचे आयोजन केले गेले.
संविधान दिनाच्या दिवशी सायंकाळी ४ वाजता शहरातील तुकाराम चौक ते शिवतीर्थ या मार्गावर संविधानाच्या प्रतीची पालखीत मिरवणूक काढण्यात येईल. या वेळी ओबीसी समूहातील नागरिकांना संविधानाचे महत्त्व, नागरिकांची जबाबदारी याबद्दल मार्गदर्शन करण्यात येईल. शहापूर तालुक्यातील सर्वांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन ओबीसी महासंघाचे तालुक्याध्यक्ष अनिल निचिते यांनी केले.