सकाळ एनआयई च्या उपक्रमाला उत्कर्ष विद्यालय शाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकाळ एनआयई च्या उपक्रमाला उत्कर्ष विद्यालय शाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ एनआयई च्या उपक्रमाला उत्कर्ष विद्यालय शाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ एनआयई च्या उपक्रमाला उत्कर्ष विद्यालय शाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

विरार, ता. २४ : विद्यार्थ्यांना आरोग्य आणि दातांची काळजी याचे महत्त्व कळावे, या उद्देशाने ‘सकाळ- एनआयई’ने मंगळवारी (ता. २२) विरार येथील प्रवीण डेंटल क्लिनिकच्या डॉ. प्रेमा क्षीरसागर यांच्यामार्फत दंत तपासणी उपक्रम राबवला. विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या उत्कर्ष विद्यालय प्राथमिक विभाग मराठी माध्यम शाळेमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. डॉ. प्रेमा क्षीरसागर यांनी ‘सकाळ- एनआयई’मध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून त्यांना योग्य सल्ला दिला. तसेच विद्यार्थ्यांना टूथ ब्रशचे मोफत वाटप केले. यावेळी प्रवीण डेंटल क्लिनिकची संपूर्ण टीम उपस्थित होती.
या उपक्रमास उत्कर्ष विद्यालयाच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भक्ती वर्तक यांनी विद्यार्थ्यांना ‘सकाळ’च्या उपक्रमांची माहिती दिली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक किरण राणे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.