भिवंडी - निजामपूर पालिका हद्दीत वाहतूक मार्गात बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडी - निजामपूर पालिका हद्दीत वाहतूक मार्गात बदल
भिवंडी - निजामपूर पालिका हद्दीत वाहतूक मार्गात बदल

भिवंडी - निजामपूर पालिका हद्दीत वाहतूक मार्गात बदल

sakal_logo
By

भिवंडी, ता. २४ (बातमीदार) : तहसील कार्यालय ते शांतीनगर चौकदरम्यान दोन्ही वाहिन्यांवर सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम करण्यात येणार आहे. यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहनांना प्रवेश बंद करून येथील वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली. गेल्या वर्षभरापासून या मार्गावर सुरू असलेल्या रस्तादुरुस्तीने वाहनांना अडथळा निर्माण झाला होता.

भिवंडी तहसीलदार कार्यालय, कचेरीपाडा ते अमजदिया मस्जिदपर्यंत हा आरसीसी रस्ता बनवण्यात येणार असल्याने दुचाकी, तीनचाकी व लहान वाहनांकरीता एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. या मार्गावरून तहसीलदार कार्यालय कचेरीपाडा येथून अमजदिया मस्जिदकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना दिघे चौकापासून प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ही वाहने तहसीलदार कार्यालय ते नागाव मार्गे तसेच तहसील ते मुरलीधर कम्पाऊंडकडून अमजदिया मस्जिद मार्गे इच्छित स्थळी जातील. दरम्यान शांतीनगर के. जी. एन. चौक येथून दिघे चौकाकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना अमजदिया मस्जिद येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. सदरची वाहने शांतीनगर के. जी. एन. चौक येथून वफा जंक्शनकडून डावीकडे वळण घेवून अमजदिया मस्जिदसमोरून सुभाषनगर मार्गे बाबला कम्पाऊंड व मुरलीधर कम्पाऊंडमार्गे तसेच अमजदिया मस्जिद येथून नागाव मार्गे इच्छित स्थळी जातील. सदरची वाहने शांतीनगर के. जी. एन. चौक येथून पंचायत समिती क्वॉर्टर्स मार्गे डावीकडे वळण घेऊन साईनगर मार्गे अशोकनगर गेट नं. १ व नं. २ येथून इच्छित स्थळी जातील. ही वाहतूक अधिसूचना रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून ते काम पूर्ण होईपर्यंत कायम राहील. पोलिस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हा बदल लागू राहणार नाही.