विनोद शेलकर यांना ग्लोबल गोल्ड स्टार पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनोद शेलकर यांना ग्लोबल गोल्ड स्टार पुरस्कार
विनोद शेलकर यांना ग्लोबल गोल्ड स्टार पुरस्कार

विनोद शेलकर यांना ग्लोबल गोल्ड स्टार पुरस्कार

sakal_logo
By

डोंबिवली, ता. २४ (बातमीदार) ः गुरुनानक इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे कला शिक्षक विनोद शेलकर यांना २०२२ चा ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड आयोजित नॅशनल लेव्हल ग्लोबल गोल्ड स्टार पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी ही निवड करण्यात आली आहे. शेलकर यांना अनेक सामाजिक संघटना आणि संस्थांच्या वतीने ७५ हून अधिक राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कल्याणमधील थ्रीडी आर्टिस्ट म्हणून त्यांना ओळखले जाते.

कल्याण तालुका कलाध्यापक संघाचे सचिव म्हणून काम पाहत असताना विद्यार्थ्यांसाठी कलात्मक वातावरण तयार करणे आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, तसेच कला शिक्षकांच्याही समस्या सोडवण्यासाठी शेलकर नेहमी आग्रही भूमिका शासनाकडे मांडत असतात. संत सावता माळी युवक संघ, भारत या संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून ते सामाजिक कार्य करत आहेत. अविष्कार एज्युकेशन फाऊंडेशन या एनजीओच्या माध्यमातून वंचित गरजवंत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य मदतीचा हात ते प्रत्येक वर्षी देत असतात. त्यांच्या या यशाबद्दल अविष्कार एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष सचिन जाधव, खजिनदार गिरीश मंजुळे, दलजीत बोन्स, प्रणय काटे, वैशाली मंजुळे, आदिती कदम, भाजप शिक्षक आघाडी प्रदेश सहसंयोजक विकास पाटील, कोकण विभाग अध्यक्ष एन. एम. भामरे, सुभाष सरोदे, दिगंबर बेंडाळे, अमोल पाटील यांनी अभिनंदन केले.