महसूलचा कारभार डिजीटल - चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महसूलचा कारभार डिजीटल - चव्हाण
महसूलचा कारभार डिजीटल - चव्हाण

महसूलचा कारभार डिजीटल - चव्हाण

sakal_logo
By

टिटवाळा, ता. २४ (बातमीदार) ः महसूल विभागातील कारभार पारदर्शक व गतिमान व्हावा, यासाठी ऑनलाईन सातबाऱ्यासह फेरफार नोंदवणे सोपे झाले आहे. जमिनीच्या कागदपत्राबाबत आता चकरा मारण्याची गरज नाही. महसूल विभाग पूर्णतः डिजिटल झाला आहे. शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण यांनी कल्याण येथे फेरफार वाटप शिबिरात बोलताना केले. या वेळी उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे पाटील, तहसीलदार जयराज देशमुख व्यसपीठावर उपस्थित होते.
या वेळी बोलताना उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण यांनी शेतकऱ्यांनी शेती दप्तराबाबतची आपली भूमिका बदलणे गरजेचे आहे असे सांगितले. तलाठी व सर्कल अधिकाऱ्यांना पारदर्शक व गतिमान कारभार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या वेळी आभिजित पाटील यांनी शेतकऱ्यांनी ऑनलाईन महसुली कागदपत्रांचा लाभ घेण्याचे आवाहन केले; तर तहसीलदार जयराज देशमुख यांनी प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. या वेळी तालुक्यातील शेतकऱ्यांना फेरफार व सात बारा उतारा नोंदीचे कागदपत्र वाटप करण्यात आली.