वाकी येथे वृक्षारोपण कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाकी येथे वृक्षारोपण कार्यक्रम
वाकी येथे वृक्षारोपण कार्यक्रम

वाकी येथे वृक्षारोपण कार्यक्रम

sakal_logo
By

विक्रमगड, ता. २४ (बातमीदार) : पर्यावरण रक्षणाचा वसा जोपासत वाकी येथे वृक्षारोपण करण्यात आले. झाडे लावा झाडे जगवा हे ब्रीदवाक्य समोर ठेवून जिल्हा परिषद शाळा वाकी येथे शाळेतील परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विक्रमगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप गीते, शिवसेना (ठाकरे गट) विक्रमगड तालुका संघटक प्रमोद पाटील, माजी उपसभापती नम्रता गोवारी, पोलिस कॉन्स्टेबल लोखंडे मॅडम, शिवसेना (ठाकरे गट) विक्रमगड उपतालुकाप्रमुख नरेश गोवारी, समीर शेलार, दीपक सकपाळ, मिलिंद पाटील, स्वप्नील पाटील, भूषण महाकाळ, प्रशांत महाकाळ, राजेश दळवी व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.