निवाराशेडमध्ये नशेखोरांचा अड्डा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवाराशेडमध्ये नशेखोरांचा अड्डा
निवाराशेडमध्ये नशेखोरांचा अड्डा

निवाराशेडमध्ये नशेखोरांचा अड्डा

sakal_logo
By

घणसोली, ता. २४ (बातमीदार)ः नोसील नाका येथे कामगारांसाठी उभारण्यात आलेला निवारा शेडमध्ये सध्या नशेखोरांचा वावर वाढला आहे. या ठिकाणी दारूच्या बाटल्या, गुटख्याची पाकिटे पहायला मिळत असल्याने अस्वच्छता पसरली आहे.
ठाणे-बेलापूर महामार्गाला खेटून घणसोली विभागात नोसील नाका येथे नाका कामगारांसाठी निवारा शेड उभारण्यात आले आहे. या ठिकाणी नाका कामगार निवाऱ्यासाठी थांबतात; मात्र रात्रीच्या वेळेस येथे नशेखोरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे या ठिकाणी दारूच्या बाटल्या, गुटख्याची पाकिटे टाकण्यात येत असल्याने नाका कामगारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच निवारा शेडमध्ये अस्वच्छता असल्याने महापालिका आणि पोलिस प्रशासनाने नशेखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी नाका कामगार करत आहेत.
------------------------------
घणसोली नोसील नाका येथे कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा शेडमध्ये नशेखोरांचा वावर वाढला आहे. याबाबत पोलिसांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
- अॅड. चेतन पाटील, अध्यक्ष, भाजप मच्छीमार सेल