चारोटी येथे गवताच्या गंजीला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चारोटी येथे गवताच्या गंजीला आग
चारोटी येथे गवताच्या गंजीला आग

चारोटी येथे गवताच्या गंजीला आग

sakal_logo
By

कासा, ता. २४ (बातमीदार) : चारोटी नाक्याजवळ अशोका हॉटेल शेजारी असलेल्या गवताच्या गंज्यांना आग लागून जवळपास १२ ते १३ लाखांचे नुकसान झाले आहे. बुधवारी (ता. २३) रात्री ११.३० च्या सुमारास या गवताच्या गंज्यांना आग लागल्याचे कळल्यावर आजूबाजूच्या नागरिकांनी व गवतमालकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.
आगीची माहिती समजताच डहाणू येथील अदाणी कंपनीच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. तसेच कासा पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारीदेखील दाखल झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले; पण एव्हढ्या काळात संपूर्ण गवत जळून खाक झाले होते. लागलेली आग भडकत असताना अनेक नागरिकांनी मदत करत काही गवताच्या गंज्या बाजूस केल्या. सोंडा भाई भरवाड आणि अल्लारखा शेख यांच्या मालकीची ही गवताची वखार होती. आगीमुळे मोठे नुकसान झाले असून गवताचा विमा काढला जात नसल्याने त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.