बोरिवलीत सापडले बेवारस अर्भक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरिवलीत सापडले बेवारस अर्भक
बोरिवलीत सापडले बेवारस अर्भक

बोरिवलीत सापडले बेवारस अर्भक

sakal_logo
By

कांदिवली, ता. २४ (बातमीदार) ः बोरिवली पश्चिम येथील एम. एच. बी. कॉलनी पोलिस ठाणे हद्दीमधील आकाशवाणी बस स्टॉपच्या मागे बेवारस नवजात अर्भक सापडले. या वेळी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बशीर शेख व निर्भया पथक याबाबत कसून चौकशी करत आहेत. रविवारी (ता. २०) रात्रीच्‍या सुमारास पोलिस हवालदार देवरंग नाईक गस्त घालत होते. या वेळी गोराई रोडवरील आकाशवाणी बस स्टॉपच्या मागे तीन ते चार दिवसांचे स्त्री जातीचे नवजात अर्भक मिळाले. नाईक यांनी मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून एम. एच. बी. कॉलनी पोलिस ठाण्याची मदत घेतली. निर्भया पथकातील महिला फौजदार कमल मौळे व पथक यांनी घटनास्थळी भेट दिली. त्‍यांनी या अर्भकाला तत्काळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. अर्भकाच्या मातेचा व पालकांचा शोध घेत असून अद्याप माहिती मिळाली नसल्‍याचे सांगितले जाते.