पत्रकारांसाठी मॅरेथॉन शुल्क माफ करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रकारांसाठी मॅरेथॉन शुल्क माफ करा
पत्रकारांसाठी मॅरेथॉन शुल्क माफ करा

पत्रकारांसाठी मॅरेथॉन शुल्क माफ करा

sakal_logo
By

विरार, ता. २४ (बातमीदार) : वसई-विरार मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पत्रकारांना मॅरेथॉन शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित यांनी केली आहे. या मागणीसाठी संदीप पंडित यांनी बुधवारी आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेतली.
वसई-विरार मॅरेथॉन स्पर्धा ११ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी ९ सप्टेंबरपासून ऑनलाईन नावनोंदणी घेण्यास पालिकेच्या वतीने सुरुवात झाली आहे.
हौशी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने नोंदणी शुल्कात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण पूर्ण मॅरेथॉनसाठी तसेच हाफ मॅरेथॉन आणि ११ किलोमीटरकरिता ७५० रुपये आणि पाच किलोमीटरसाठी हे शुल्क ७०० रुपये इतके आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या वसई-विरार महापालिका क्षेत्रातील पत्रकारांना हे शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी संदीप पंडित यांनी केली आहे.