दिव्यात रेशनिंग दुकानाची संख्या वाढविण्याचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यात रेशनिंग दुकानाची संख्या वाढविण्याचे आदेश
दिव्यात रेशनिंग दुकानाची संख्या वाढविण्याचे आदेश

दिव्यात रेशनिंग दुकानाची संख्या वाढविण्याचे आदेश

sakal_logo
By

दिवा, ता. २४ (बातमीदार) : नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दिव्यात नवीन रेशनिंग ऑफिस व नवीन रेशनिंग दुकानांना परवानगी मिळावी, अशी मागणी भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री व नागरी अन्नपुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन केली. त्यानंतर चव्हाण यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
ठाणे जिल्ह्यातील दिवा शहराची लोकसंख्या मागील काही वर्षांत वेगाने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत येथे प्रशासकीय व्यवस्था अस्तित्वात नाही. रेशनिंग सुविधांसाठी येथील नागरिकांना डोंबिवली व मुंब्रा या शहरांवर अवलंबून राहावे लागते. दिवा शहरात रेशनिंग ऑफिस नसल्याने व रेशनिंग दुकानांचे जाळे मजबूत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असते. नागरिकांची हीच अडचण लक्षात घेऊन शिवाजी आव्हाड यांनी या गंभीर विषयावर मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन दिवा शहरात रेशनिंग ऑफिस व वाढीव रेशनिंग दुकाने यांना मंजुरी द्यावी, अशी मागणी केली. या मागणीची तातडीने दखल घेत मंत्री चव्हाण यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत आदेश दिले असल्याची माहिती शिवाजी आव्हाड यांनी दिली.