मुरबाड येथे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुरबाड येथे आंदोलन
मुरबाड येथे आंदोलन

मुरबाड येथे आंदोलन

sakal_logo
By

मुरबाड, ता. २४ (बातमीदार) ः राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या आदी मागण्यांसाठी मुरबाड तहसीलवर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी किसान सभेने केली आहे.

वनजमीन कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात, तालुक्यातील नेहरूवाडी, ओजिवले, आंबेमाळी, खानिवरे, खांडपे इत्यादी आदिवासी वाडी पाड्यांवर जाण्यासाठी रस्ता तयार करावा आदी मागण्याही या वेळी करण्यात आल्या. या वेळी कॉ. पी. के. लाली, कॉ. डॉ. कविता वरे - भालके, किसान सभा तालुका सचिव कॉ. दिलीप कराळे, सीटू मुरबाड तालुका अध्यक्ष कॉ. दिनेश जाधव, कॉ. सागर भावार्थे आदी कार्यकर्ते सहभागी झाले.