शिवडी पादचारीपुलाचा निर्णय लवकरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवडी पादचारीपुलाचा निर्णय लवकरच
शिवडी पादचारीपुलाचा निर्णय लवकरच

शिवडी पादचारीपुलाचा निर्णय लवकरच

sakal_logo
By

शिवडी, ता. २४ (बातमीदार) ः प्रवाशांच्या सोयीसाठी बांधण्यात येणारा शिवडी पादचारी पूल पहिल्‍या टप्‍प्‍यात रेल्वेस्थानकाच्या पुलाला प्लॅटफॉर्म क्रमांक १ ला जोडण्यात येणार आहे आणि नंतर हा रेल्वेस्थानकातील पूल शिवडी पूर्वेकडे उतरवणार आहेत. या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी बुधवारी (ता. २३) मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष, तसेच भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी राजीव जलोटा यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. ही बैठक शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी आयोजित केली होती. या वेळी मुंबई पालिका पूल विभागाचे सहायक अभियंता कुणाल वैद्य आणि कनिष्ठ अभियंता स्वाती पाटील, माजी नगरसेवक सचिन पडवळ उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान या दोन्ही कामांना मुंबई पोर्ट ट्रस्टचे ना हरकत प्रमाणपत्र लवकरच मिळावे, अशी विनंती केली आणि प्रभाग क्रमांक २०६ मधील बहारी बिल्डिंग, तसेच मॉडर्न बिल्डिंग आणि शिवडी दर्गा या तिन्ही जागेवर मुंबई पोर्ट ट्रस्ट अन्यायकारक कर आकारणी करत आहे, हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनीही लवकरच प्रक्रिया करू आणि मार्ग काढू, असे आश्वासन दिले असल्याची माहिती माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली.