पश्चिम रेल्वेवर १५ डब्याच्या ६७ फेऱ्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम रेल्वेवर १५ डब्याच्या ६७ फेऱ्या!
पश्चिम रेल्वेवर १५ डब्याच्या ६७ फेऱ्या!

पश्चिम रेल्वेवर १५ डब्याच्या ६७ फेऱ्या!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : पश्चिम रेल्वे मार्गावर प्रशासनाने १२ डब्यांच्या लोकल १५ डब्यांत परावर्तीत करत एकूण २६ फेऱ्या सुरू केल्या. त्यामध्ये भर घालत एकूण ६७ फेऱ्या वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या वाढीव फेऱ्या टप्प्याटप्प्याने चालविण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे. त्यामुळे प्रवाशांचा लोकल प्रवास गर्दीमुक्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर गेल्या काही दिवसांपासून जागेवरून लोकल प्रवाशांमध्ये हाणामारीच्या घटना घडत आहेत. शिवाय गर्दीच्या वेळी प्रवास असह्य होत आहे. या पार्श्वभूमीवर लोकलची आसन क्षमता वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार २१ नोव्हेंबरपासून १२ डब्यांच्या २६ लोकल १५ डब्यांमध्ये परावर्तीत केल्या. त्यामुळे प्रवाशांना गर्दीतून दिलासा मिळाला. या नवीन फेऱ्यांची भर पडल्याने पंधरा डब्यांच्या लोकलच्या फेऱ्यांची एकूण संख्या १०६ वरून १३२ झाली. त्यात टप्प्याटप्प्याने ६७ फेऱ्यांची भर पडणार आहे. त्यामुळे लोकलच्या आसन क्षमतेत अंदाजित ५० टक्क्यांनी वाढ होणार आहे.