लाखोंची फसवणूक करणारा अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाखोंची फसवणूक करणारा अटकेत
लाखोंची फसवणूक करणारा अटकेत

लाखोंची फसवणूक करणारा अटकेत

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ : घरामध्ये खोदकाम करताना जमिनीच्या आतून गुप्तधन सापडल्याचे सांगून लाखोंची फसवणूक करणाऱ्या राजस्थानी टोळीतील दोन जणांना अंधेरी येथून गुन्हे शाखा युनिट १२च्या पथकाने अटक केली आहे. मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने आरोपींना ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मंचाराम परमार, जगदीश ऊर्फ ​​जगाराम साखला अशी दोघांची नावे आहेत. पोलिसांनी या दोन्ही आरोपींकडून २ मोबाईल फोन आणि बनावट सोने जप्त केले आहेत. काही जणांनी गुप्तधन मिळवून देण्याच्या नावावर ४ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार कुरार पोलिस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका स्टेशनरी दुकान मालकाने केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने तपास सुरू केला.