ठाणे शहारात गोवरचा पहिला बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे शहारात गोवरचा पहिला बळी
ठाणे शहारात गोवरचा पहिला बळी

ठाणे शहारात गोवरचा पहिला बळी

sakal_logo
By

ठाणे, ता. २४ : शहरात गोवरचा पहिला बळी गेल्याची गुरुवारी (ता. २४) नोंद करण्यात आली. मृत मुलगी शिळ येथील पत्राचाळ येथे राहत असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली. महापालिकेचे पथक सर्वेक्षण करत असताना सोमवारी पथकाला एका साडेसहा वर्षांच्या मुलीमध्ये गोवरची लक्षणे दिसून आली. तिला सुरुवातीला शिळ आरोग्य केंद्रात नेण्यात आले; परंतु तिची प्रकृती ठीक नसल्यामुळे तिला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे मंगळवारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात तिचा मृत्यू गोवरने झाला असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. तसेच मृत्यू झालेल्या बालकाचे लसीकरणदेखील झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.