''एथर''चा होसूरमध्ये दुसऱ्या प्रकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''एथर''चा होसूरमध्ये दुसऱ्या प्रकल्प
''एथर''चा होसूरमध्ये दुसऱ्या प्रकल्प

''एथर''चा होसूरमध्ये दुसऱ्या प्रकल्प

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा :
होसूर, ता. २५ : देशातील ईव्ही स्कूटर क्षेत्रातील अग्रगण्य एथर एनर्जीने भविष्यातील वाहन निर्मिती क्षेत्रातील यशस्वी घोडदौड कायम ठेवली आहे. ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याबरोबरच कंपनीने ईव्ही स्कूटरला वाढणारी मागणी लक्षात घेता होसूर येथे नवा उत्पादन निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पातून दिवसाला २०० स्कूटरची निर्मिती होणार आहे.
इंधनाच्या वाढत्. दरांसह वाढलेले प्रदूषण लक्षात घेता पर्यावरणपूरक वाहनांच्या निर्मिती केली जात आहे. त्यामुळेच अल्पवधीतच ईव्ही स्कूटरची संकल्पना अधिक लोकप्रिय झाली आहे. या क्षेत्रात अनेक कंपन्या उतरल्या असून एथर एनर्जीने स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याबरोबर नवनवीन संशोधन केले जात आहे. याच अनुषंगाने कंपनीने आपल्या उत्पादन क्षमतेचा विस्तार करण्यासाठी होसूर येथे बुधवारी (ता. २३) दुसऱ्या स्कूटर निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ केला. या प्रकल्पातून एथरने वर्षाला ४,२०,००० स्कूटर निर्मितीचे उद्दिष्ट आखले आहे. तसेच नव्या प्रकल्पात सुरक्षित आणि दर्जेदार वाहन निर्मिती होणार आहे. यासाठीचे नावीन्यपूर्ण संशोधन, पर्यावरणपूरक वातावरण आणि तंत्रज्ञानांचा वापर केला आहे. त्यामुळे ईव्ही स्कूटरच्या क्षेत्रातील एथर एनर्जीचा दबदबा कायम राहणार आहे.

नव्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये :
विस्तीर्ण जागा :
एथर एनर्जीचा नवा प्रकल्प ३०,००० स्वेअर फूट जागेवर आहे. त्यात दोन युनिट आहेत. एका युनिटमध्ये बॅटरी उत्पादन, तर दुसऱ्या युनिटमध्ये वाहन निर्मिती होणार आहे.

''आत्मनिर्भर भारत''ला चालना :
केंद्र सरकारच्या ''आत्मनिर्भर भारत'' संकल्पनेला अनुसरून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात ४० सेकंदाला एक, तर दिवसाला २०० स्कूटरची निर्मिती होणार आहे.

गुणवत्तेवर भर :
होसूरच्या या प्रकल्पात वाहनांच्या गुणवत्तेवर अधिक भर देण्यात आला आहे. प्रत्येक वाहन निर्मिती ही सुरक्षा तसेच तंत्रज्ञान याचा वापर करून केली जात आहे.

प्रशिक्षित कर्मचारी :
एथर एनर्जीच्या नव्या प्रकल्पात १६०० कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. तसेच महिला कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देताना त्यांचे सक्षमीकरण केले जात आहे.

पर्यावरपूरक वातावरण :
होसूरच्या प्रकल्पात पर्यावरणपूरक बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कंपनीने ''गो ग्रीन'' ची संकल्पना राबवत पाण्याचा पुनर्वापार आणि कमीत कमी प्लास्टिक वापरावर भर दिला आहे.

२०२३ पर्यंत १०० शहरांमध्ये सेवा :
एथर एनर्जीने वाहन निर्मितीबरोबर बाजारपेठ विस्तारावर लक्ष केंद्रित केले आहे. २०२३ पर्यंत १०० शहरांतील १५० ठिकाणी वाहन विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहेत; तर ५०० ठिकाणी वाहनांच्या जलद चार्जिंग स्टेशची सुविधा असणार आहे.

कोट
ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी एथर एनर्जी कटिबद्ध आहे. यासाठी नव्या प्रकल्पात पर्यावरणपूरक, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधनावर भर
दिला आहे. ज्यामुळे ईव्ही स्कूटर क्षेत्रात एथर एनर्जी हा सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे.
- स्वप्नील जैन, सह संस्थापक आणि सीटीओ एथर एनर्जी.

तीन वर्षांतील उत्पादन क्षमता :
सन वाहन निर्मिती
२०१८ - १७५०
२०२१ - ९२००
२०२२ - ३५०००''एथर''चा होसूरमध्ये दुसरा प्रकल्प