उल्हासनगर डंपिंग ग्राउंडवर पुन्हा आगडोंब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगर डंपिंग ग्राउंडवर पुन्हा आगडोंब
उल्हासनगर डंपिंग ग्राउंडवर पुन्हा आगडोंब

उल्हासनगर डंपिंग ग्राउंडवर पुन्हा आगडोंब

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : शहरातील डम्पिंग ग्राऊंडवर गुरुवारी (ता. २४) रात्री आगडोंब उसळला. तब्बल दोन किलोमीटर धुराचे लोट पसरल्याने नागरिकांचा जीव धुरामुळे रात्रभर गुदमरल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे. रात्री लागलेली आग आज (ता. २५) सकाळी ११ च्या आसपास अग्निशमन विभागाच्या जवानांनी आटोक्यात आणली.

उल्हासनगर कॅम्प नंबर ५ मधील गायकवाड पाडा येथील खदानीत पर्यायी डम्पिंग ग्राऊड ओव्हर-फ्लो झाले आहे. मात्र सात वर्षांपासून डम्पिंग जैसे थे असल्याने आणि त्यावर विशेषतः उन्हाळ्यात सातत्याने आगी लागत असल्यामुळे त्याच्या धुराने नागरिक विविध आजारांनी त्रस्त झालेले आहेत. पावसाळ्यात डम्पिंगवरील कचऱ्याचे दूषित पाणी घरात जात असल्याने नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, जिल्हा समन्वयक धनंजय बोडारे यांनी डम्पिंगवर लागणाऱ्या आगी, घरात शिरणारे पावसाचे पाणी आदी प्रकाराने नागरिक आजारी पडत आहेत. हे थांबवण्यासाठी डम्पिंग बंद करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येणार, असा इशारा पालिकेला निवेदनाद्वारे दिला होता. त्यानंतर गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास डम्पिंगवर मोठा आगडोंब उसळला.

उसाटने येथे उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरासाठी मिळून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प लवकरच राबवण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर कचऱ्याचा प्रश्न मिटणार आहे.
- जमीर लेंगरेकर, अतिरिक्त आयुक्त, उल्हासनगर महापालिका