एटीएम फोडण्याचा चोरट्याचा प्रयत्न अयशस्वी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एटीएम फोडण्याचा चोरट्याचा प्रयत्न अयशस्वी
एटीएम फोडण्याचा चोरट्याचा प्रयत्न अयशस्वी

एटीएम फोडण्याचा चोरट्याचा प्रयत्न अयशस्वी

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : खैरणे एमआयडीसीतील श्रमिकनगर भागात असलेल्या एटीएमचे सेफ्टी ड्रॉवर तोडून त्यातील रक्कम लुटण्याचा चोरट्याने प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र त्याला एटीएममधील पैसे चोरता न आल्याने रिकाम्या हाती पळून जावे लागले. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी (ता. २५) पहाटेच्या सुमारास खैरणे एमआयडीसीतील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये चोरटा घुसला होता. त्याने आपण पकडले जाऊ नये, यासाठी प्रथम आतमध्ये असलेले सीसी टीव्ही कॅमेरे वेगवेगळ्या दिशेला फिरवले. त्यानंतर एटीएमचे सेफ्टी ड्रॉवर तोडून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला मशीनमधील पैसे काढता आले नाहीत. त्यामुळे त्याने त्या ठिकाणावरून रिकाम्या हाती पळ काढला. शुक्रवारी सकाळी ७ वाजता एटीएम सेंटरचा कर्मचारी सफाईसाठी गेला असता, त्याला हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर त्याने याबाबतची माहिती कंपनीला व तुर्भे एमआयडीसी पोलिसांना दिली.